वकिलाकडून लाच घेताना सरकारी वकिलाला पकडले

पाच हजार रुपये लाच मागून त्यातील साडेतीन हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना सोन्नीस पकडले गेले.
वकिलाकडून लाच घेताना सरकारी वकिलाला पकडले
Crime.jpg

पिंपरीः एका वकिलाकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना खेड (जि. पुणे) सत्र न्यायालयातील सरकारी वकिल (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता) देवेंद्र मधूकर सोन्नीस (वय ५७) यांना बुधवारी (ता. १४) पकडण्यात आले. यामुळे खेड सत्र न्यायालयात खळबळ उडाली आहे. (The government prosecutor was caught taking a bribe from a lawyer)

पाच हजार रुपये लाच मागून त्यातील साडेतीन हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना सोन्नीस पकडले गेले. या घटनेतील तक्रारदार वकीलांच्या अशीलाच्या म्हणजे पोलिसांकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील आऱोपीच्या जामीन अर्जावर हरकत ना घेण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

१ ते ८ जुलैदरम्यान त्याची पडताळणी करून खात्री करण्यात आली. त्यानंतर आज हा ट्रॅप लावण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतर लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया खेड पोलिस ठाण्यात सुरु करण्यात आली आहे.एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) उपअधीक्षक विजयमाला पवार याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा..

विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

नगर : कानडे मळा परिसरात वसाहती वाढत आहे, त्यामुळे येथील नागरिकांना सुविधा पुरविणे आपले कर्तव्य आहे. या भागातील नागरिकांचे प्रश्‍न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यापुर्वीही या भागात टप्प्याटप्प्याने विकास कामे केली आहेत, काही प्रलंबित आहेत तीही पूर्ण होतील. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात मोठा प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.

आज उद्घाटन होत असलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यास परिसरातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे. नागरिकांनी ही कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. कामे दर्जेदार झाल्याने ती दिर्घकाळ टिकतात. या भागातील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत आहोत. या विकास कामांना आपण निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले.

कानडे मळा येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा प्रारंभ मनापा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते वाजिद जहागिरदार, बबनराव व्यवहारे, वसंत कापरे, अशोक शिंदे, रोहित कानडे, अमित कानडे, मीना कापरे, संगीता कानडे, मीना उर्किडे, वंदना वने, ज्योती कानडे, प्रेमल व्यवहारे, ज्योती कुडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.