धक्कादायक : बनावट आरटीपीसीआर द्वारे देत होते कोरोना अहवाल

हिंजवडी पोलिसानी ही कामगिरी केली असून ती गरजू प्रवाशांना हे खोटे मेडिकल सर्टिफिकेट देत होती. चारजणांच्या या टोळीतील सर्वजण परप्रांतीय आहेत.
धक्कादायक : बनावट आरटीपीसीआर द्वारे देत होते कोरोना अहवाल
RTPCR .jpg

पिंपरी : बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शननंतर आता बनावट आरटीपीसीआर अहवाल (कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र) देणारी टोळीही पोलिसांनी पकडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलिसानी ही कामगिरी केली असून ती गरजू प्रवाशांना हे खोटे मेडिकल सर्टिफिकेट देत होती. चारजणांच्या या टोळीतील सर्वजण परप्रांतीय आहेत. 

पत्ताराम केसाराम देवासी, राजू भाटी (वय ३३, दोघेही सध्या रा. वाकड, पिंपरी-चिंचवड) राकेशकुमार बस्तीकुमार वैष्णव (वय २५,रा. धनकवडी, पुणे) आणि चिरंजीव अशी आरोपींची नावे आहेत. ते गरजू प्रवाशांना आवश्यक असलेले कोरोना झाला नसल्याचे बनावट प्रमाणपत्र देत होते. ते वैष्णव हा  देत होता. बावधन, पुणे येथील लाईफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या लॅबच्या नावे डॉक्टरांचे बनावट नाव व सहीनिशी ती दिली जात होती. त्याबाबत तपास पथकाचे (डीबी) सहाय्यक निरीक्षक सागर काटे यांना खबर मिळताच वाकड येथे धाड टाकून हिंजवडी पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 

पुण्यात दोन दिवसांपूर्वीच असेच बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्या जोडगोळीला डेक्कन पोलिसानी पकडले होते. तर, रेमडेसिव्हिर बाटलीत पॅरासिटामॉल भरून ती चढ्या दराने विकणाऱ्या चारजणांच्या टोळीचा बारामती पोलिसांनी चार दिवसांपूर्वी (ता.१६) पर्दाफाश केला होता. तर, सोमवारी श्रीरामपूरमध्ये रेमडेसिव्हिरच्या कुपीत सलायन भरून तुटवडा असलेल्या या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. टंचाई आणि गरज यातून ही बनावटगिरी सुरु झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.