वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, संजय राऊतांच्या राज ठाकरेंना शुभेच्छा ! 

राज हे जाहीरसभा तर नेहमीच गाजवित असतात. लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या सभेला जमतात.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, संजय राऊतांच्या राज ठाकरेंना शुभेच्छा ! 

मुंबई : वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, असे रसिक मनाचे व्यंगचित्रकार, राजकारणी अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे चाहते त्यांना बाळासाहेबांचे वारसदार म्हणून पाहात होते. काहीसे आक्रमक आणि सडेतोड भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरेंचा राज्यातच नव्हे तर देशात मोठे समर्थक आहे. ते मनसेचे अध्यक्ष असले तरी सर्वपक्षीयातील नेतेही त्यांचे मित्र आहे. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे आशिष शेलार असतील. राजकारणापलिकडे जाऊन मैत्री ठेवणारे अनेक मित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. 

राज यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांना मानणारे अनेक शिवसैनिकही आहेत. राज हे जाहीरसभा तर नेहमीच गाजवित असतात. लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या सभेला जमतात.

एककाळ असा होता की शिवसेनेतील जे फायरबॅंड नेते होते ते राज यांचे कडवे समर्थक होते. पण, उद्धव ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री झाली आणि हे आपसूकच राज यांच्यापासून दूर झाले. तरीही प्रेम आणि दोस्तीही कमी झाली नाही किंवा दुरावाही आला नाही. असे सर्वपक्षात राज यांचे मित्र आहेत. 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेकदा राज ठाकरे आणि मनसेवर सामनातून सहकून टीका केली आहे. राज यांनी तशाच रोखठोक भाषेत शिवसेनेला उत्तर दिले आहे. मात्र राजकारण करीत असताना कधीही कटुता आली नाही. 

राज यांचा वाढदिवस. शिवसेनेतील कोणी त्यांना शुभेच्छा देण्यापूर्वीच राऊत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाद वादळातीलह मित्रत्वाचे नाते टिकून राहिले असे राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  
 

Related Stories

No stories found.