मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांचे कोरोनामुळे निधन

त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांचे कोरोनामुळे निधन
Former Sarpanch of Medankarwadi Ramdas Medankar dies due to corona

चाकण (जि. पुणे) : खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (Medankarwadi) गावचे माजी सरपंच, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास मुरलीधर मेदनकर (वय ५८) (Ramdas Medankar) यांचे कोरोनामुळे (corona) उपचारादरम्यान निधन (passes away) झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मेदनकरवाडीच्या माजी सरपंच प्रियांका मेदनकर-चौधरी या त्यांच्या कन्या होत. (Former Sarpanch of Medankarwadi Ramdas Medankar dies due to corona)

रामदास मेदनकर यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे पुण्यात आज सकाळी निधन झाले.

मेदनकरवाडी गावच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग होता. गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. गावची पाणीपुरवठा योजना व इतर समस्या त्यांनी तळमळीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले. औद्योगिकरणामुळे मेदनकरवाडी गावची लोकसंख्या पन्नास हजारांवर पोचली असताना रहिवाशांचे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी कामगार, अव्यवसायिक, महिला यांच्या आर्थिक विकासासाठी शरद नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली होती. पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. वडील रामदास मेदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका मेदनकर-चौधरी यांनी गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात चांगले काम केले होते. त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधून प्रियांका यांचा कोरोनाच्या साथीतील उत्कृष्ठ कार्याबद्दल गौरव केला होता.

भाजपचे युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष, सोरतापवाडीचे आदर्श माजी सरपंच सुदर्शन चौधरी हे त्यांचे जावई होत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in