राज्यसभेचे माजी खासदार, पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय होते.
राज्यसभेचे माजी खासदार, पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन
Sarkarnama (57).jpg

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी खासदार rajya sabha member आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. चंदन मित्रा chandan mitra (वय६५) यांचं बुधवारी मध्यरात्री दिल्लीत निधन झालं.  ते काही दिवसापासून आजारी होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. वेकेंया नायडू आदींनी चंदन यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे. राजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात चंदन मित्रा यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.  मित्रा हे 'द पायनियर'चे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, चंदन मित्रा हे उत्कृष्ट पत्रकार होते. खासदार म्हणूनही त्यांचा कारकिर्द उत्तम होती. इतिहास, संस्कृती, हिंदी भाषा यात त्यांचे योगदान महत्वाचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय पत्रकारीता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. 

भाजप वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याइतका मोठा नाही! 
“डॉ. चंदन मित्रा यांची ओळख ही कुशाग्र बुद्धी आणि दूरदृष्टी असणारी व्यक्ती अशी होती. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं टि्वट नरेंद्र  मोदींनी केलं आहे.  

मित्रा ऑगस्ट २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून २०१० मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपकडून राज्यसभेत निवडून आले. २०१६ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. केंद्रात सत्ताबदल होऊन मोदी सरकार आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने त्यांना पक्षात महत्वाच्या जबाबदाऱ्यापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातं. जुलै २०१८ मध्ये मित्रा यांनी भाजपचा राजीनामा दिला. ते तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय होते.
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.