नारायण राणेंना या आधी अटक झाली होती... पण केंद्रीय मंत्री पोलिसांच्या पहिल्यांदाच ताब्यात!

राणेंच्या अटकेने राजकीय वाद
नारायण राणेंना या आधी अटक झाली होती... पण केंद्रीय मंत्री पोलिसांच्या पहिल्यांदाच ताब्यात!
narayan rane copy

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याबद्दल केंद्रीय सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक झाल्याने देशभरात त्यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तमिळनाडूसारख्या राज्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करतानाचा ड्रामा हा 1999 मध्ये देशभरात टिव्हिवरून पाहिला गेला होता. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याला अशी अटक झाली. ती पण महाराष्ट्रात. (First time union minister arrested in the state) 

नारायण राणे हे आमदार असताना 1992 मध्ये श्रीधर नाईक यांचा खून झाला होता. त्या वेळी त्यांना अटक झाली होती. या आधी चेंबूर परिसरातूनही पोलिसांनी त्यांना अनेक वेळा उचलले होते, असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक करतात. श्रीधर नाईक खून प्रकरणात न्यायालयाने राणे यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर राणेंचे संशयाने नाव घेतले गेले ते सत्यविजय भिसे खून प्रकरणात. विरोधकांनी 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकांत त्यांच्यावर याप्रकरणी अनेकदा आरोप केेले. पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकू शकले नाहीत. त्यामुळे केवळ राजकीयदृष्ट्याच ते आरोप होत राहिले. 

राणे हे 1995 नंतर सतत पोलिसांचे सलाम घेत राहिले. युती काळात मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महसूलमंत्री, उद्योगमंत्री म्हणून ते सतत लाल दिव्याच्या गाडीत राहिले. अपवाद फक्त 2014 ते 2021 या कालावधीत. ते साधे आमदारही 2014 च्या निवडणुकीत राहिले नाहीत. नंतर ते विधान परिषदेवर गेले आणि कालांतराने राज्यसभेत गेले. ते 45 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री झाले. या कालावधीत पोलिस कारवाईचा सामना त्यांना कधी करावा लागला नाही.

आपल्या लाडक्या आणि राजकीय कारकिर्द घडविणाऱ्या सिंधुदर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री म्हणून प्रवेश करण्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे त्यांचे तेथील जंगी राजकीय स्वागत लांबणीवर पडले. 

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता या असताना त्यांनी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांना झोपेतून उठवून अटक केली होती. तेव्हा देखील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर येते. केंद्राने तेव्हा राज्यावर दबाव टाकून केंद्रीय मंत्र्यांची सुटका करण्यास भाग पाडले होते. राणे प्रकरणाता आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.  

Related Stories

No stories found.