राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल.. 

संतोष चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत.
Sarkarnaa Banner (24).jpg
Sarkarnaa Banner (24).jpg

जळगाव : भुसावळ येथे अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चैाधरी यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.Filed a case against former MLA Santosh Chaidhary

 शहरातील टिंबर मार्केटमधील सर्व्हे  २०६ वरील अवैध बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती व या संदर्भात शहानिशा करण्याबाबत भुसावळ मुख्याधिकार्‍यांना सोमवारी पत्र देण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी चिद्रवार व पालिकेचे कर्मचारी टिंबर मार्केटमधील सर्व्हे २०६ वरील सर्वोदय छात्रालयाच्या गेल्यानंतर तिथे माजी आमदार संतोष चैाधरी यांनी येत मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला. 

त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, सरकारी कामात अडथळा आणला, असा आरोप आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चैाधरी यांच्याविरूध्द  रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 

माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान.."मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत..."
ऋषिकेश : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने ते वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, "देशात मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत. मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे," असे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले. ऋषिकेश येथे रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत बोलत होते. ते म्हणाले की कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लशीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समाजात याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in