पोपटराव पवारांचे क्रिकेटप्रेम सांगत आदिती तटकरेंनी केले हिवरे बाजारचे कौतुक

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे शासकीय विश्रामगृहावर पद्मश्री पोपटराव पवार यांची राज्यमंत्री तटकरे यांनी भेट घेतली.
पोपटराव पवारांचे क्रिकेटप्रेम सांगत आदिती तटकरेंनी केले हिवरे बाजारचे कौतुक
popatrao pawar.jpg

टाकळी ढोकेश्वर : राज्याच्या क्रीडा व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांचा नुकताच दोन दिवसीय अहमदनगर जिल्हा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल, अहमदनगर एमआयडीसी व राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे भुषण असणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचीही भेट घेतली. 

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे शासकीय विश्रामगृहावर पद्मश्री पोपटराव पवार यांची राज्यमंत्री तटकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आदर्श गाव संकल्पना ग्रामविकास या विषयांवर चर्चा केली.यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. पोपटराव पवार हे त्यांच्या तारुण्यात उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. 

हेही वाचा...

तटकरे म्हणाल्या, जिल्ह्यातील गावांमधील ग्रामस्थांची मानसिकता विकासाच्या दृष्टीने पुढे नेली आहे. हिवरे बाजार गावासारखा प्रत्येक गाव आपल्या जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. हिवरे बाजारमध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजना व त्यामधून उभे राहीलेले आदर्श गाव हे पाहण्यासाठी यायचे आहे एका खेळाडूने देशातील सर्वोत्कृष्ट आदर्श गाव निर्माण केले याचा अभिमान वाटतो

हिवरे बाजारचे काम सातत्याने ऐकत आहे.पवार यांनी सरपंच म्हणून ग्रामविकास, पाणी, स्वच्छता, पर्यावरण यावर केलेले काम उल्लेखनीय आहे. नगर जिल्ह्यात आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आदर्श गाव संकल्पना लक्षात येते येथील पर्यटन विकास शासकीय योजना कश्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत याचा अभ्यास करून ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे तटकरे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.