एकनाथ खडसेंच्या जावयाचा तुरुंगातील मुक्काम वाढला 

खडसे यांनी मात्र जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
 Girish Chaudhary .jpg
Girish Chaudhary .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चैाधरी (Girish Chaudhri) यांना ईडीने (ED) अटक केली होती. त्यांना विशेष न्यायालयाने येत्या 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर ईडीने गुरुवारी (ता. १५ जूलै) त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आली आहे. (Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary remanded in ED custody till July 19)    

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरून खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचे जावई व पत्नीचेही या प्रकरणात नाव आहे. यापूर्वीही ईडीने खडसे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या आधी ईडीकडून चौधरी यांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर 12 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आता त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.  

दरम्यान, खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली. ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

खडसे यांनी मात्र जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मुळ जमीनमालकच या जमिनीचा मालक आहे. त्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतलेला नाही. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्याने कुणीही जमी विकत घेऊ शकतो. हे कायदेशीरच आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली होती. आपल्यामागे ईडी लावल्यास सीडी लावेन, अशा इशारा त्यांनी दिला होता. खडसे यांच्या या वक्तव्याची त्यावेळी बरीच राजकीय चर्चा झाली होती.   

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in