`इडी` चे प्रमुख अधिकारी भाजप मध्ये सामील होत आहेत का?

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करताना दिसतं. मग इतर राज्यात काहीच घडत नाही का?. उलट त्या राज्यांत अन्य राज्यांपेक्षा अधिक भयंकर घडत आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
`इडी` चे प्रमुख अधिकारी भाजप मध्ये सामील होत आहेत का?
Sanjay Raut

नाशिक : महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करताना दिसतं. (centre`s Agencies much active in Maharashtra, West Bengal & Zarkhand) मग इतर राज्यात काहीच घडत नाही का?. (Is it means that nothing happens in other states?) उलट त्या राज्यांत अन्य राज्यांपेक्षा अधिक भयंकर घडत आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. 

खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे `ईडी`  लावली आहे. अन्य लोकांना नोटिस देण्यात दिल्या जात आहेत. माझ्याकडे ही १०० नावे आहेत. ती मी अजून दिलेली नाहीत. मी अजूनही थांबलेलो आहे. शिवसेना नेत्यांच्या पाठी `ईडी` लागली तरी काही हरकत नाही, मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू. 

खासदार राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणी विचारले असता त्यांनी या प्रकरणावर भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले की, भाजपचे प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना छत्रपती संभाजी राजे यांची उपमा दिली होती. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 

यासंदर्भात राऊत यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही शिवसेना भवन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जरा वेगळ्या पद्धतीने लावला तर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला होता. मग आता अशा प्रकारे वक्तव्य करण्यात येत आहे. त्यावर मराठा संघटनांनी भूमिका घ्यावी. संभाजी भिडे यांनीही याबाबत बोलणे  आता बंद करावे. 

पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे. बाहेरचा माणूस येतो आणि शिवसेना भवनावर दगड मारण्याची भाषा करतो. कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारेन असा बोलतो.  हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे लोक बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे बोलणारे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. 

श्री. राऊत म्हणाले, तुम्ही लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स करा. पण आमच्या सोबत सामना करणं अशक्य आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही करायचे ते करत रहा.
...
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in