ईडीने फास आवळला; अनिल देशमुखांच्या मुंबईतील घरावरही छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आवळला आहे.
ईडीने फास आवळला; अनिल देशमुखांच्या मुंबईतील घरावरही छापा
ED raids Anil deshmukhs residence in Nagpur and Mumbai

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आवळला आहे. नागपूर येथील घरावर ईडीने आज सकाळी पुन्हा छापा मारला. त्याचवेळी त्यांच्या मुंबईतील घरातही ईडीने झाडाझडती सुरू केल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ईडीकडून देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (ED raids Anil deshmukhs residence in Nagpur and Mumbai)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. तसेच सीबीआयकडून देशमुख यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. ईडीने यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरावर छापा टाकला होता. आता आज पुन्हा छापेमारी सुरू असून त्यात आता मुंबईतील घराचीही झाडाझडती सुरू केली आहे. 

देशमुख यांचे वरळीतील सुखदा इमारतीमध्ये घर आहे. नागपूरसोबतच या घरातही शोधमोहिम सुरू आहे. याठिकाणीही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशमुखांच्या दोन्ही घरांवर छापे टाकल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

जयंत पाटलांकडून संताप

सर्व एजन्सीचा वापर केला जात आहे. अनिल देशमुखांकडे काही सापडले नाही. सीबीआयच्या चौकशीतही काही आढळून आले नाही. आता त्यांचे आर्थिक व्यवहार तपासायचे, दहा वर्षांपूर्वीचं काही तरी काढायचं अन् एफ.आय.आर. दाखल करायचा. छापे मारायचे काम सुरू आहे हा अनुभव सर्वांना येतोय, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

काँग्रेसकडून टीका

''परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.'' असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले होते.

''अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी'', असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.