पुरंदरच्या तहसीलदारांचा चालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह

पुरंदर तालुका तहसील कार्यालयाचे एक कर्मचारी आणि तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्या शासकीय वाहनाचा चालक म्हणून काम करणाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यास पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुरंदरच्या तहसीलदारांचा चालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह
The driver of Purandar tehsildar was found to be corona positive

सासवड : पुरंदर तालुका तहसील कार्यालयाचे एक कर्मचारी आणि तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्या शासकीय वाहनाचा चालक म्हणून काम करणाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यास पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र खुद्द तहसीलदार, काही नायब तहसीलदार, तहसील कार्यालयामधील अनेक कर्मचाऱ्यांवर तसेच काही तलाठी, मंडल अधिकारी, चालकाचे सासवडचे कुटुंबातील गावाकडील लोक, काही मित्र यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. अनेकांवर होम वा संस्थात्मक क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. 

सासवडचे तहसीलदार कार्यालय हे जुन्या गावठाणलगत नदीपलीकडे आहे. त्यामुळे गावठाण बऱ्यापैकी बंद झाले आहे. हा चालक कधी नायब तहसीलदारांच्या बंगल्यात व कधी हिवरे या त्याच्या गावीही जात होता. तहसीलदार सरनौबत यांच्याबरोबर तो प्रत्येक बाधित गावात व इतरही दौऱ्यात असायचा. ओळखी फार असल्याने व गप्पांची आवड असल्याने त्याचा संपर्क तपासताना मेहनत घ्यावी लागणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पुरंदर तालुका हादरला आहे. 

पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनीच आज (ता. 11 जून) ही माहिती दिली की. या प्रकरणातील चालक कर्मचारी शनिवारपासून कार्यालयात आलेला नाही. त्यांना सोमवारी लक्षण दिसून आल्याने मंगळवारी स्वॅब तापसनिकरिता पाठविला होता. त्याचा अहवाल बुधवारी रात्री पॉझीटिव्ह स्वरूपात प्राप्त झाला. त्यास पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया, संपर्कातील लोक शोधणे, त्यांचे क्वारंटाइन, काहींचे नमुने तपासणीला पाठविणे, परीसर सर्व्हे, कंटेन्मेंट झोन करुन कार्यवाही करणे आदी करण्यात प्रशासन पुढाकार घेत आहे. 

तालुक्‍यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण 13 असून त्यापैकी दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. आज दवाखान्यात एकूण 5 रुग्ण आहेत, सहा जण उपचार घेऊन बरे होऊन घरी परत आले आहेत. 

दरम्यान, आमदार संजय जगताप यांनी जनतेला विनंती केली की; कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोनामुक्तीसाठी त्रिसूत्री वापरा. चुक केली तर भोगायला लागेल. परिवार, कुटुंब आणि गावची काळजी घ्या. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तातडीने येथे तहसील कार्यालयाऐवजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन पुढील नियोजन केले आहे. 
 

आळंदीमधील माउली मंदिर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर 

आळंदी : वारकऱ्यांनी आळंदी (ता. खेड) येथे येण्याचा प्रयत्न करू नये. पंढरपूरप्रमाणेच आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरच्या व्यक्तीस राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर साथरोख प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबत आळंदीत चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. 

माऊलींच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. 13 जून) आळंदीत मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र, नुकतेच आळंदीत कोरोनाने एक महिला मृत झाली आहे. पालखी सोहळ्याच्या तोंडावरच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली. माऊली मंदीर व लगतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. 

Related Stories

No stories found.