पारनेरमध्ये वाद पेटला : नीलेश लंकेंच्या कट्टर कार्यकर्त्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

आमदार नीलेश लंके यांचे कट्टर कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात आज पारनेर पोलिस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पारनेरमध्ये वाद पेटला : नीलेश लंकेंच्या कट्टर कार्यकर्त्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
Crime.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ नंतर गढूळ झालेले पारनेरचे राजकीय वातावरण काही शांत होत नसल्याची स्थिती आहे. आमदार नीलेश लंके यांचे कट्टर कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात आज पारनेर पोलिस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, तासगावतील येडू माता मंदिर सभामंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी मी वनकुटेचे सरपंच राहुल बबन झावरे यांच्याकडे केली होती. यावर राहुल झावरे म्हणाले मी दशक्रिया विधीसाठी येणार आहे. तू तिथे ये. मी माझ्या बरोबर गावातील प्रल्हाद रामचंद्र पवार व नाथा गणपत बर्डे असे तिघे जण ऩऊ वाजेच्या सुमारास तेथे गेलो. त्यानंतर तेथे थोड्याच वेळात सरपंच राहुल झावरे आले.

हेही वाचा...

दशक्रियेचा कार्यक्रम झाल्यावर तेथून लोक निघून गेले. त्यावेळी मी सरपंच झावरे यांना म्हणालो की, येडू माता मंदिराला सभा मंडप मंजूर झालेला आहे. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव करून द्या. त्यावर तो म्हणाला की, तुला काय करायचे ते कर तर तो म्हणाला तुला सांगितलेले कळत नाही का. मी म्हणालो साहेब जातीवाचाक शिव्या देऊ नका.

मी तुम्हाला वेडेवाकडे बोलत नाही. एकतर आमच्या देवीला सभामंडपासाठी आम्ही विनंती करतो. तर तो म्हणाला, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का असे म्हणून मला मारहाण करत तुला काय करायचे ते कर म्हणून निघून गेला. राहुल झावरे यांनी जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यामुळे पारनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकारामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. महसूल विभागातील आंदोलनाचे वारे शांत झाले असले तरी पारनेर तालुक्यातील राजकीय वाद शांत होत नसल्याची स्थिती आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in