पंकजांच्या पराभवासाठी मदत करणाऱ्या मित्राला धनंजय मुंडेंकडून गिफ्ट!

पंकजांच्या पराभवासाठी मदत करणाऱ्या मित्राला धनंजय मुंडेंकडून गिफ्ट!
dhanjay-munde-sanjay dound

पुणे : परळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पंडितराव दौंड यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडे यांनी पंडितराव यांच्या मुलाचा म्हणजे संजय यांचा पराभव केला होता. त्याच संजय यांच्यासाठी धनंजय यांनी विधान परिषदेची उमेदवारी खेचून आणली.

धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून झाल्याने त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने संजय दौंड यांना उमेदवारी दिली.

धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून विजय मिळवला. तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला. आज त्याच संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयन्त केले तर धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी दौंड पितापुत्रांनी मेहनत घेतली होती. त्याची परतफेड धनंजय यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in