सोलापूरच्या उपमहापौरांना या अटींवर मिळाला अटकपूर्व जामीन 

फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी (ता. 6) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला.
सोलापूरच्या उपमहापौरांना या अटींवर मिळाला अटकपूर्व जामीन 
The deputy mayor of Solapur got pre-arrest bail on these conditions

पुणे : फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी (ता. 6) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. 

काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औदुंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

सांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांचे पथक 29 मे रोजी सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन, हे पथक त्याच दिवशी रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना शिंका येऊ लागल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मात्र, ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक होते. पण त्यांना सोडून देण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. 

दरम्यान, काळे यांनी ऍड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दुपारी एक ते चार या वेळेत सांगवी पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहायचे. तपासात सहकार्य करण्याच्या या अटींवर व 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर काळे यांची सुटका करण्यात आली. 
 

 'फरार' होणे दोन पोलिस अधिकाऱ्यांना भोवले 

पुणे : सोलापूरचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना दोन गुन्ह्यांत मदत करणे पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांना चांगलेच महाग पडले आहे. काळे यांना सोलापुरातून गाजावाज करून फसवणुकीच्या गुन्ह्यातून पकडून सांगवी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना अटक करून न्यायालयाता नेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना ठाण्याबाहेर सहज जाऊन दिले. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) सोलापुरातून ताब्यात घेतले. त्यांना 30 मे रोजी न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र त्या सायंकाळी उशिरापर्यंत अटकेची पूर्तता न झाल्याने काळे हे सरळ पोलिस ठाण्यातून फरार झाले. त्याला पोलिसांची साथ होती की काय, असा सुरवातीपासून संशय होता. मात्र काळे यांना शिंका आल्याने, ताप असल्याने कोरोनाचा संशय होता. ती भीती असल्याने त्यांना सोडून दिल्याची सारवासारव नंतर पोलिसांनी केली होती. 

फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी व सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात सांगवी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व अन्य कर्मचारी शुक्रवारी सकाळी गेले होते. त्यानंतर त्यांनी काळे हा कुठे आहे, याची माहिती घेतली. त्यांना 29 मे रोजी घरातून अटक केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना चोवीस तासांच्या आत न्यायालयात दाखल करणे आवश्‍यक होते. मात्र ती कार्यवाही होण्याच्या आतच ते फरार झाल्याचे वृत्त सर्वप्रथम सरकारनामाने दिले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in