कंबरडे मोडलेल्या उद्योगांना सावरा ; राणेंसमोर उद्योजकांनी मांडल्या व्यथा 

उद्योजकांच्या व्यथा थेट दिल्लीत राणेंसमोर मांडून विशेष पॅकेज पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांसाठी देण्याची मागणी केली.
कंबरडे मोडलेल्या उद्योगांना सावरा ; राणेंसमोर उद्योजकांनी मांडल्या व्यथा 
Sarkarnama Banner - 2021-08-11T102216.224.jpg

पिंपरी : कोरोना निर्बंधामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील  Pimpri Chinchwad उद्योगांची विस्कटलेलीआर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसह अन्य योजनांच्या माध्यमातून निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील Vikrant Patil, उपाध्यक्ष अनुप मोरे व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यांनी उद्योगनगरीतील उद्योजकांच्या व्यथा थेट दिल्लीत राणेंसमोर मांडून विशेष पॅकेज पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांसाठी देण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे यांच्यावर महत्वाची जबाबदारी नुकतीच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या खांदेपालटात सोपविली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोनामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी राणेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण, कोरोनामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केल्याने उद्योगांचे कंबरडेच मोडले आहे. लाखो कामगारांच्या नोक-या गेल्या आहेत. काहींना 50 टक्के मासिक वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे. तर, उलाढाल ठप्प झाल्याने अनेकांचे  वेतन गेल्या दीड वर्षापासून थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मोरे यांनी राणे यांची भेट घेऊ त्यांच्याशी चर्चा केली.

शेतकरी आंदोलनात आजी, माजी आमदार एकमेकांना भिडले 
पिंपरी-चिंचवड हे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. परंतु, सध्या तेथील उद्योगांवर वाईट वेळ आली आहे. निर्बंधामुळे ते मेटाकुटीला आले आहेत. उलाढाल होत नसल्यामुळे छोट्या-मोठ्या उद्योजकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातू मार्ग काढण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून उद्योग आणि कामगाराची आर्थिक घडी बसवण्यासाठी हातभार लावावा. उद्योग वाढीसाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या विशेष पॅकेजमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा. जेणेकरून उद्योगाची उलाढाल वाढून लाखो कामगारांचा आर्थिक लाभ होईल. याबाबत शहरातील कामगारांना आपल्याकडून आपेक्षा लागली आहे, अशी भावना  मोरे यांनी राणे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावर रोजगार टिकवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन राणेंनी दिले. आता नागरिकांचा संयम सुटत चालला असल्याने आपणच पुढाकार घेऊन छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवून सामान्य नागरिकांना त्याच्या रोजीरोटीची व्यवस्था करावी, अशी विनंती यावेळी राणेंना करण्यात आली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मोरे यांनी सांगितले.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.