महाराष्ट्राच्या बदनामीची सायबर क्राईम कडून चौकशी

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता बिहारची निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे प्रभारी आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला बदनाम केलं त्या पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे
Cyber Crime will investigate Maharashtra Defamation Plot say Anil Deshmukh
Cyber Crime will investigate Maharashtra Defamation Plot say Anil Deshmukh

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची व महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. या प्रकाराची चौकशी सायबर क्राईमकडून करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली.

सोशल मिडियावर सुमारे ऐंशी हजार बनावट खाती उघडून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत देशमुख म्हणाले, "सुशांतसिंग केसचा 'एम्स'चा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी मीडियाला जाहीर करण्यात आला. त्यात ७ सिनियर डॉकटर चा रिपोर्ट होता. व्हिसेरा मध्ये कोणताही विषाचा चा अंश आढळला नाही असं समोर आलं आहे. सीबीआयच्या अंतिम रिपोर्टची सर्वजण वाट पाहत आहेत. हा रिपोर्ट लवकर आला तर हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल,''

देशमुख पुढे म्हणाले, "एका राजकीय पक्ष्याने हा विषय वेगळ्या वळणावर नेला.  एका राष्ट्रीय पक्षाने शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्र आणि पोलिस खात्याचे नेतृत्व केलं ते फडणवीस पोलिसांबाबत बोलले. कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्रलाही बदनाम केलं. महाराष्ट्रच्या बाहेरील कठपुतलीला आपल्या तालावर नाचवलं. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,"

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता बिहारची निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे प्रभारी आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला बदनाम केलं त्या पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in