BREAKING : ‘तबलीगी जमात’शी संबंधित ‘त्या’ रुग्णांचा चौदा दिवसांनंतरचा रिपोर्टही ‘पॉझिटीव्ह’

दिल्लीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने चौदा दिवसांचे उपचार घेतल्यानंतरही त्याचे दुसरे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे
BREAKING : ‘तबलीगी जमात’शी संबंधित ‘त्या’ रुग्णांचा चौदा दिवसांनंतरचा रिपोर्टही ‘पॉझिटीव्ह’
Tablighi Markaz Returned Patient Again Tested Poitive in Pimpri

पिंपरी : दिल्लीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने चौदा दिवसांचे उपचार घेतल्यानंतरही त्याचे दुसरे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे. तसेच भोसरी परिसरातील आणखी एका पुरुष रुग्णाचे रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या पस्तीस वर पोहचली आहे. 

आजपर्यंत शहरातील अठ्ठे चाळीस जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी बारा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तेवीस आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा अठ्ठावीस जणांपैकी दोन जणांचे रिपोर्ट दोन एप्रिल रोजी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. त्यानंतर त्यांच्या  हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिका, दिल्ली, मुंबईमार्गे पुणे असा प्रवास करुन आला होता. 

रुग्णाने केला विविध भागात संचार

त्यानंतर या रुग्णाने शहरातील थेरगाव, खराळवाडी भागात प्रवास केला होता. या कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराला चौदा दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले. परंतु, दुस-या चाचणीतही हा रुग्ण पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दहा मार्च ला पिंपरी-चिंचवड शहरातील अठ्ठेचाळीस जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी बारा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय पस्तीस रुग्ण शहरात आहेत. त्यातील अकातीस रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.