पुण्यात सहायक पोलिस आयुक्तांना कोरोनाची लागण 

पुणे पोलिस दलातील एका सहायक पोलिस आयुक्तांना कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे.
पुण्यात सहायक पोलिस आयुक्तांना कोरोनाची लागण 
Corona infection in Pune Assistant Commissioner of Police

पुणे : पुणे पोलिस दलातील एका सहायक पोलिस आयुक्तांना कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत पोलिस ठाण्याच्या पातळीवर असलेला कोरोनाचा संसर्ग आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापर्यंत पोचला आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून आत्तापर्यंत पुणे पोलिस दलातील 54 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या 54 पोलिसांपैकी 30 जण बरे झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांवर सध्या उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत पोलिस कर्मचारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना पोलिस ठाण्याच्या पातळीवर होता.

आत्ता मात्र वरिष्ठ पोलिस अधिकारी कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत: विलगीकरण करून घेतले आहे. तर त्यांच्या दैनंदिन संपर्कात येणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली 7881 

पुणे : कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या 209 अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 
पुण्यात गेल्या 24 तासांत केलेल्या नमुने तपासणी अहवालातील 159 जणांना कोरोनाचे निदान झाले. 

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात 119, ससूनमध्ये 6 तर खासगी रुग्णालयात 34 जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 881 झाली आहे. सध्या विविध रुग्णालयांत 2 हजार 484 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 209 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 50 जणांना उपचारासाठी व्हेंटिलेटर ठेवले आहे. 

शहरात 24 तासांत आणखीन 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये भुसावळ येथील 37 वर्षीय रुग्णाचा, सोलापूर येथील 48 वर्षीय खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य सहा जण हे पुणे शहर हद्दीतील असून, 36 ते 83 या वयोगटातील तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, येरवडा, नारायण पेठ, लष्कर परिसरातील ते होते. यातील बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयविकार होता, असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

पिंपरीत आढळले उच्चांकी 62 कोरोना रुग्ण 

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 7) एकाच दिवसात सुमारे 62 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. या सर्वांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 वर जाऊन पोचली आहे. यातील 18 जण हे पुणे आणि बाहेरील रुग्ण होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होते. 

रविवारी आढळलेल्या 62 जणांमध्ये 32 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरी, जुनी सांगवी, पाटीलनगर- चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर- भोसरी, पवनानगर येथील व्यक्तींचा समावेश आहे. 
 

Related Stories

No stories found.