कनेक्शन लूज की टाईट.. रवींद्र चव्हाण यांनी दिले हे उत्तर!

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलादालनात मंगळवारी विकासकामांचा लोकार्पण सोहळा राजकीय टीकाटिप्पणीनेच गाजला.
ravindra chavhan.jpg
ravindra chavhan.jpg

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत विविध प्रकल्पांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. हा सोहळा आज राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलादालनात मंगळवारी विकासकामांचा लोकार्पण सोहळा राजकीय टीकाटिप्पणीनेच गाजला. बुधवारीही या कार्यक्रमाचे पडसाद समाज माध्यमावर उमटत होते. 'आमदार चव्हाण यांचे कनेक्शन टाईट करा' हे भाजपाचेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य असलेला व्हिडीओ सेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व्हायरल करीत असून त्यावर अनेक मिम्सही तयार होत आहेत. 

हेही वाचा...

आमदार चव्हाण यांना सत्ताधारी टार्गेट करीत आहेत हे लक्षात येताच भाजपा कार्यकर्त्यांनी चव्हाण यांची त्याच मंचावरील भाषणाची फेसबुक पोस्ट शेअर करत भावनिक साद घातली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय नाट्यपूर्ण घडामोडी मंगळवारी घडल्या. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री, खासदार यांनी त्यांच्या कानपिचक्या घेतल्या. 

मंत्री कपिल पाटील यांच्या भाषणाच्या सुरवातीला त्यांचा आवाज येत नव्हता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना आवाज जात नसला तरी मला आवाज येत होता, म्हणजे आपल्यातील कनेक्शन स्ट्रॉंग आहे. कनेक्शन लूज झाले की आमदार चव्हाण यांच्यासारखी परिस्थिती होते. 

हेही वाचा...

त्यावर भाजप केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले चव्हाण यांचेही कनेक्शन टाईट करा असे बोलल्याने दालनात हशा पिकला. याच मुद्द्याला हात घालत आता सेनेच्या कार्यकर्त्यांनी कापली पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर खाली आमदार चव्हाण यांचे कनेक्शन टाईट करा असे लिहीत संदेश व्हायरल केले जात आहेत. यावर अनेक मिम्सही तयार झाले आहेत. 

यावर भाजप कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांची बाजू उचलून धरत चव्हाण यांनी याच मंचावर एक कार्यकर्ता म्हणून मांडलेली व्यथा व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. चव्हाण यांनी फेसबुक पेजवर त्या भाषणाचा काही मजकूर पोस्ट केला आहे. हाच मजकूर शेअर करण्यास कार्यकर्त्यांनी सुरवात केली आहे. तसेच खाली भावनिक कमेंटसही करण्यात आल्या आहेत. 

कार्यक्रम विकास कामांचा असला तरी भाजपा आमदार यांनी जगविलेल्या युतीच्या आठवणी आणि आताची भाजपा कार्यकर्त्यांची व्यथा यामुळे पुढे रंगलेले राजकीय नाट्यपूर्ण गोष्टींनी भाजप आमदार चव्हाण हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

रवींद्र चव्हाण यांनी का म्हटले आहे?
मा उद्धवजी, 

आपलं आणि डोंबिवलीच वेगळं नातं आहे. आम्ही आपल्याला  आमच्या डोंबिवलीकर परिवारातील एक सदस्य मानत आलो आहोत. डोंबिवलीच्या अंतर्गत रस्ते, कल्याण शीळ रस्ता कचरा कर याबाबत मनात साचलेल्या व्यथांना तुमच्या समक्ष मांडण्याचं ठरवलं. तुम्ही मला जवळून ओळखता टीकेला टीका हा माझा स्वभाव नाही आणि तशी माझी विचारसरणी मला शिकवत नाही. कोणी गाय मारली म्हणून मी वासरू मारण्याचं पातक करणार नाही. पण माझ्या डोंबिवलीकरांच्या  जेन्युईन व्यथा या कोपर पूल उदघाटन प्रसंगी आपल्या समोर मांडण्याची संधी मला हवी होती. भाजपा शिवसेना कार्यकर्ते म्हणून कायम मांडीला मांडी लावून काम केले. आज भाजपा म्हणून आम्ही आपल्या पक्षाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये सोबत नाही तरीही शहराच्या विकासासाठी आपल्या राज्यातील बाबूगिरीला आवार घाला शहराच्या व शहरवासियांच्या  हिताच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणा राबताना दिसत आहे त्या प्रवृत्तीला वेळीच रोखा..

उद्धवजी तुमच्या डोंबिवलीसाठी एवढं कराच..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in