पुणेकर संकटात; भाजप नेते आर्थिक व्यवहरात : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप 

कोरोनाचे गंभीर संकट असताना पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी रस्ते रूंदीकरणाच्या प्रस्तावावरून आर्थिक व्यवहार करीत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या विषयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, नगरसेवक विशाल तांबे आणि कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदींनी भाजपवर शरसंधान केले आहे.
पुणेकर संकटात; भाजप नेते आर्थिक व्यवहरात : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप 
Congress-NCP allegations against BJP over road widening

पुणे : कोरोनाचे गंभीर संकट असताना पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी रस्ते रूंदीकरणाच्या प्रस्तावावरून आर्थिक व्यवहार करीत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या विषयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, नगरसेवक विशाल तांबे आणि कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदींनी भाजपवर शरसंधान केले आहे. 

शहरातील सहा मीटरचे 323 रस्ते नऊ मीटर करण्यावररून कोरोनाच्या संकट काळातही जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर करण्याची भाजपची व्यूहरचना आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशिष्ट रस्त्यांचाच प्रस्ताव का आणण्यात येत आहे, असा आरोप या संदर्भात करण्यात येत आहे. शहरातील 323 रस्त्यांच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या आजच्या (ता. 9) बैठकीत निर्णय होणार आहे. दरम्यान, बैठकीला हजर राहण्याबाबत भाजपने सर्व सदस्यांना "व्हीप' काढला आहे. 

रस्त्याच्या मुद्यावरून पालकमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करीत निर्णय एकतर्फी न घेण्याची सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वी केली आहे. ठराविक रस्ते रुंदीचा प्रस्ताव मंजूर केल्यास राज्य सरकार हस्तक्षेप करेल, असा इशाराही पवार यांनी दिला होता. तरीही संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आणून तो मंजूर करण्याच्या हालचाली भाजपने केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर बंगल्यावर बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी समितीचे सर्व सदस्य उपस्थितीत राहावेत, यासाठी भाजपने "व्हीप'ही काढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

रस्ते रूंदीकरणाच्या विषयात एकतर्फी निर्णय घेतल्यास राज्य सरकार हस्तक्षेप करील, असा इशारा पालकमंत्री पवार यांनी दिलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी जपून निर्णय घेतील, असे सांगण्यात महापालिकेतील पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. महापालिका चुकीचे निर्णय घेऊ लागली, तर राज्य सरकारला आम्ही पुण्याच्या विषयात लक्ष घालण्यासाठी आग्रह करू, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले 

पुणेकरांवर कोरोनाचे संकट असताना सत्ताधारी भाजप नेते आर्थिक व्यवहारात दंग असल्याचा आरोप सर्वच पक्षांनी सुरू केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनीही भाजपवर आरोप केला आहे.

सध्याची परिस्थिती लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. रूग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी भाजपचे पदाधिकारी या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ रस्त्यांच्या विषयाला सर्वाधिक महत्व देत असल्याची टीका नगरसेवक तांबे यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in