मुंबईत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी पाच हजार रुग्ण... - condition of corona in mumbai deteriorates | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी पाच हजार रुग्ण...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

मुंबईत बुधवारी (ता.24) तब्बल 5 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. तर, 2088 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलंय. मुंबईत कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झालाय.

मुंबई: मुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालल्याचे चित्र दिसते. मुंबईत बुधवारी (ता.24) तब्बल 5 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. तर, 2088 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलंय. मुंबईत कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याचे दर 90 टक्के आहे. 17 ते 23 मार्चदरम्यान कोरोनारुग्ण वाढीचा दर 0.79 टक्के आहे, कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 84 दिवसांवर आलाय तर 39 अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. 432 इमारती सील करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. 

महापालिकेच्या माहितीनुसार, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा अॅलर्टवर आहेत. मुंबईत 8851 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. आयसीयू बेड्स 1559 तर 978 व्हॅन्टिलेटर बेड्स उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 

त्यामुळे आता राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊनबाबतही विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख