मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार

आरोग्याच्या कोणत्याही कारणामुळे कोरोनाची लस मिळाली नाही, त्यांना यातून दिलासा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार
Vaccination.jpg

चंदिगड :  ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.  काल झालेल्या उच्चस्तरीय व्हर्च्युअल कोविड आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा कठोर निर्णय घेतला. 

''ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री  अमरिंदर सिंग amarinder singh यांनी काल जाहीर केले. 

ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या कोणत्याही कारणामुळे कोरोनाची लस मिळाली नाही, त्यांना यातून दिलासा देण्यात आला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत लस घ्यावी लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 15 सप्टेंबरपर्यंत लस घेतली नाही तर त्याला सक्तीने रजेवर पाठवले जाईल. जोपर्यंत ते लसीचा पहिला डोस घेत नाहीत, तोपर्यंत ही रजा सुरू राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

सपाचे खासदार आजम खान यांना योगी सरकारचा दणका 
नवी दिल्ली : नियमभंग केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आजम खान Azam Khan यांना उत्तर प्रदेश सरकारने दणका दिला आहे. उत्तर प्रदेश सरकाने मो. अली जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारण्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.