केंद्राचे नफ्याचे खासगीकरण; तोट्याचे राष्ट्रीयकरण धोरण... - Centre privatising profit and nationalising loss, says Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

केंद्राचे नफ्याचे खासगीकरण; तोट्याचे राष्ट्रीयकरण धोरण...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा 

नवी दिल्ली:   काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्राचे नफ्याचे खासगीकरण तर तोट्याचे राष्ट्रीयकरण धोरण सुरू असल्याचा घणाघाती आरोप गांधी यांनी केला. केंद्राकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण सुरू असून आंदोलन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या सोबत मी असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सरसकट खासगीकरण होत असून ते कुणाच्याच हिताचे नाही, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. खासगीकरणाच्या विरोधात ९ बँकांची संघटना असणाऱ्या युनियन फोरम आॅफ बँक युनियनच्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांकडून १५ आणि १६ मार्च रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले होते की सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण केले जाणार असून केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणाअंतर्गत ते केले जाईल, असे स्पष्ट केले होते. 

या घोषणेनंतर देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. केंद्राच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन केले. आपण बँक कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी मंगळवारी केले. दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांपाठोपाठ जीवन विमा काॅर्पोरेशनच्या (एलआयसी) युनियनमधील कर्मचारी देखील १८ मार्च रोजी खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.  

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख