जुन्नरच्या आशुतोष डुंबरेंसह राज्यातील ६७ पोलिसांना राष्ट्रपती पदक

आशुतोष डुंबरे यांनीमुंबईच्या गुन्हे शाखेचे प्रमुख पदाचाही कार्यभारसांभाळला होता.
Central government announces Medal of Bravery and Service to 67 policemen in the state
Central government announces Medal of Bravery and Service to 67 policemen in the state

मुंबई : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एक हजार ३८० पोलिस पदकांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६७ पोलिसांचा शौर्य तसेच सेवा पदकांनी गौरव करण्यात आला आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे, नाशिक ग्रामिण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तम अहिरे आणि यवतमाळच्या महामार्ग सुरक्षा पथकाचे विनोदकुमार तिवारी यांचा समावेश आहे. (Central government announces Medal of Bravery and Service to 67 policemen in the state)

दरम्यान,  पुणे पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक पॉल अँथोनी, विजय भोसले यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.  

शौर्य पदकासाठी ६२८ पोलिसांची नावे जाहीर झाली आहेत, यात राज्यातील २५ पोलिस आहेत; तर जम्मू -काश्मीर पोलीस दलातील एसआय अमरदीप आणि सीआरपीएफचे जवान सुनील दत्तात्रेय काळे (मरणोत्तर) यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाईल. उल्लेखनीय सेवेसाठी राज्यातील तिघांसह ८७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके आणि उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील ३९ पोलिसांसह ६६२ पोलिसांना पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

यावर्षी जम्मू -काश्मीरच्या एकूण २७५ पोलिसांना त्यांच्या शौर्य आणि सेवेसाठी सन्मानित केले जाणार आहे. जम्मू-काश्मीर पोलिस दलातील २५६ , सीआरपीएफचे १५९, आयटीबीपीचे २३, ओडिशा पोलिसांचे ६७, महाराष्ट्रातील २५, छत्तीसगडचे २१ आणि इतर राज्यांतील पोलिसांनाही शौर्य पदकांनी गौरवण्यात येणार आहे.

याशिवाय इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलातील एकूण २३ जवानांपैकी २० जवानांना मे-जून २०२० मध्ये त्यांनी पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. आयटीबीपीच्या जवानांना ही आतापर्यंत सर्वात अधिक देण्यात आलेली शौर्य पदके आहेत. याशिवाय गलवान खोऱ्यातील ८ जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १८ मे २०२० रोजी लडाखमधील फिंगर ४ परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान दाखवलेल्या धैर्यासाठी ६ जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; तर लडाखमध्येच हॉट स्प्रिंग्जजवळ शौर्यपूर्ण कृतीसाठी ६ जवानांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांमध्ये केलेल्या कामगिरीसाठी ३ जवानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


आशुतोष डुंबरे यांना राष्ट्रपती पदक

जुन्नर तालुक्याचे भुमिपुत्र, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांनाही उल्लेखनीय कामगिरी आणि अतिविशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे प्रमुख पदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यांच्यासह पोलिस शौर्यपदकासाठी उपायुक्त मंजुनाथ सिंगे व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त ज्येत्स्ना रासम यांचेही नाव जाहीर करण्यात आले आहे.


पुण्यातील सुरेंद्रनाथ देशमुख, पॉल अँथोनी, विजय भोसले यांचा सन्मान 

केंद्र सरकारकडून घोषीत करणाऱ्या आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदक पुणे पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक पॉल अँथोनी, विजय भोसले यांना जाहीर झाले आहे.  

देशमुख हे पुणे पोलिस दलामध्ये गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. देशमुख मुळचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील इंदुरी-रुम्भोडी गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी 36 वर्षे सेवा बजावली असून त्यांना पावणे चारशे बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी मुंबई शहर, नवी मुंबई, पुणे ग्रामीण, पुणे शहर, सांगली, औरंगाबाद शहर येथे सेवा बजावली आहे. मुंबईतील कामाठीपुरा येथील दंगलीची खबर मिळताच 8 पोलिसांसह घटनास्थळी जाऊन गोळीबार करीत दंगलीवर नियंत्रण मिळविले होते. पोलिस अधिकाऱ्यास मारहाण करून त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर पळवून नेणाऱ्यास 12 तासांत अटक केली. येरवडा कारागृहातील जिंदा व सुखा हे अतिरेकी ठेवलेल्या अंडा सेलमध्ये एकट्याने जाऊन त्यांच्याकडील पिस्तुलाची झडती घेतली होती. 

पुणे पोलिस दलाच्या विशेष शाखेतील परकीय नागरीक नोंदणी विभागात अँथोनी हे सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत आहेत. अँथोनी यांना आपल्या 34 वर्षांच्या सेवेत 310 बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पोलिस मुख्यालय, डेक्कन पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, निगडी पोलिस ठाणे, मार्केट यार्ड पोलिस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली आहे. 

भोसले हे सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांना आत्तापर्यंत 349 बक्षिसे मिळाली आहेत. पोलिस महासंचालक सन्मान चिन्हही मिळाले आहे. त्यांनी गुन्हे शाखा, स्वारगेट पोलिस ठाणे, वाहतूक नियंत्रण शाखा, खडक पोलिस ठाणे येथे सेवा बजावली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांचे मदतनीस म्हणून काम करताना गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोका, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याच्या कारवाईत सहभाग आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in