लेकीच्या मांडव टहाळीत नाचणे अंगलट; भाजप आमदार लांडगेंवर गुन्हा दाखल  

कोरोनामुळे सध्या राज्यभरात लॅाकडाऊन आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे.
लेकीच्या मांडव टहाळीत नाचणे अंगलट; भाजप आमदार लांडगेंवर गुन्हा दाखल  
MLA Mahesh Landage .jpg

पिंपरी : भोसरीचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष महेश लांडगे (Mla Mahesh landge ) यांचा बेफाम नाचतानाचा व्हिडिओ समोर आला होता. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. (A case has been registered against BJP MLA Mahesh Landage)
  
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्यासह 3 नगरसेवक आणि 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना विरुद्ध नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आमदार लांडगे यांच्यावर पोलिस आणि महापालिकेचा आरोग्य विभाग कारवाई करणार का असा सवाल नागरिकांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.    

दरम्यान, लांडगे यांच्या मुलीचे लग्न आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडवटाळ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार महेश लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले होते. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला होता. या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवले होते.

कोरोनामुळे सध्या राज्यभरात लॅाकडाऊन आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. लग्न समारंभासाठी फक्त 25 जणांना परवानगी आहे. मात्र, या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याच बरोबर मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे कोरोना बाबतच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नव्हते.   

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी अद्याप काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अद्याप ही संख्या खाली आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे स्पष्ट करत बारावीसाठी काय धोरण ठरवायचे, हे लवकरच जाहीर करू, असे ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच लाॅकडाऊन लगेच शिथिल होणार नाही, हे देखील त्यांनी ठामपणे सांगितले. तो पंधरा दिवसांनी वाढविणार असल्याची त्यांनी घोषणा केली. 

शहरातील वाढ थांबली आहे. कोरोनामुक्त गाव, असा निर्धार करायला हवा. माझे घर कोरोनामुक्त राहिले तर माझी वस्ती कोरोनामुक्त राहिल आणि त्यातून माझे गाव कोरोनामुक्त आपोआप होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.