नगरमध्ये महापालिका कामगार संघटनेची संपाची हाक

शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी कंटेन्मेंट झोन करण्यात आले होते. त्यातही महापालिका कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
नगरमध्ये महापालिका कामगार संघटनेची संपाची हाक
Nagar Mahapalika1.jpg

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा हाहाकार मजविला होता. या शहराला कोरोना पासून वाचविण्यात अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक शहरात यायचे त्यांच्या जेवणाचा मोठा प्रश्न होता अशा वेळी त्यांनी पैसे गोळा करत कम्युनिटी किचन संकल्पना राबविली. शहराची स्वच्छता ठेवली.

शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी कंटेन्मेंट झोन करण्यात आले होते. त्यातही महापालिका कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांवर अहमदनगर शहरातच अंत्यविधी केले जायचे त्यातही जीव धोक्यात घालून महापालिका कर्मचाऱ्यांनी काम केले.

हेही वाचा...

अहमदनगर शहराला मागील दोन वर्षांत कचराकुंडी मुक्त शहर करून करण्यात याच कर्मचाऱ्यांचे श्रम आहे. शहर देशातील पहिल्या 40 स्वच्छ शहरात पोचले. स्वच्छता अभियानात तीन स्टार व ओडीएफ प्लसप्लसचे मानांकन मिळाले. 

कोरोना कालावधीत कर्तव्य बजावत असताना महापालिकेच्या 19 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. एक हजारपेक्षाही जास्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. कोरोनाशी दोन हात करत त्यांनी शहराला कोरोनापासून वाचविण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. 

हेही वाचा...

महापालिकेत तीन हजार कर्मचारी आहेत त्यातील एक हजार 850 कर्मचारी कायम स्वरूपी आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळी सानुग्रह अनुदान दोन टप्प्यात व महागाईच्या मानाने कमी मिळाले होते. यंदा दिवाळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने करत 19 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला आज दिला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी दिली.


कोरोना काळात महापालिका कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असूनही सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. त्यांना दिवाळी सानुग्रह अनुदानातून न्याय मोबदला मिळावा, अशी आमची माफक मागणी आहे. ही मागणी महापालिका प्रशासनाने त्वरित पूर्ण करावी. अन्यथा आम्हाला संपाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना

Related Stories

No stories found.