बुट्टे पाटलांनी विचारला झेडपीच्या सीईओंना जाब : बदल्या करून कोरोनाशी कसे लढणार

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सुरुवातीच्या काळात कमी जाणवणारा कोरोनाचा संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लक्षणीय स्वरुपात दिसून येत आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात कोरोना यौद्ध्यांची आवश्यकता आहे. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांचा बदल्या करून आपण कोरोनाविरोधात कसे लढणार,असा सवाल जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना केला आहे.
बुट्टे पाटलांनी विचारला झेडपीच्या सीईओंना जाब : बदल्या करून कोरोनाशी कसे लढणार
Sharad Butte Patil asks ZP CEOs : How to fight corona by making transfers

पुणे  : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सुरुवातीच्या काळात कमी जाणवणारा कोरोनाचा संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लक्षणीय स्वरुपात दिसून येत आहे.

कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात कोरोना यौद्ध्यांची आवश्यकता आहे. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांचा बदल्या करून आपण कोरोनाविरोधात कसे लढणार, असा सवाल जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना केला आहे. 

शरद बुट्टे पाटील यांनी एक पत्र पाठवून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी प्रसाद यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या होत्या. परंतु बदल्यांचा अध्यादेश जुलैच्या पहिल्या आठवड्यात अचानक काढण्यात आला. त्यात ३१ जुलैपर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, असे सूचविले आहे. या बदल्या आता १० आॅगष्टपर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 

बदली प्रक्रियेमुळे समुपदेशनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कसे बोलावणार, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना रूजू होण्यासाठी ७ दिवस दिले जातात? त्या कर्मचाऱ्याच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी कोण काम करणार? नवे कर्मचारी रूजू होईपर्यंत रुग्णांना देखभाल व उपचाराविना ठेवणार का? या बदली प्रक्रियेमुळे कोरोनाविरोधातील लढाई विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रश्न बुट्टे पाटील यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत. 

बदल्या रद्द करण्याची झेडपी कर्मचाऱ्यांची मागणी 

नांदेड आणि लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण विभागाचे अध्यक्ष या नात्याने आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रद्द केल्या आहेत. बदल्या रद्दचा हा नांदेड आणि लातूर पॅटर्न पुणे जिल्ह्यातही राबवून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया या वर्षी रद्द करावी, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. 

बदली पात्र अनेक कर्मचारी सध्या जिल्ह्यातील विविध कोवीड केअर सेंटर, क्वरांटाइन सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि तपासणी नाक्यांवर सेवा बजावत आहेत. शिवाय कोरोना संसर्गाच्या भितीने खासगी गाड्या मिळत नाहीत. यामुळे बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास जाण्यासाठी अडचणी आहेत. याचा विचार करून यंदाच्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी आणि पुणे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.