'बसप'चा चार ठिकाणी स्वबळाचा नारा... - BSP to contest assembly polls in 4 places separately  | Politics Marathi News - Sarkarnama

'बसप'चा चार ठिकाणी स्वबळाचा नारा...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

तामिळनाडू, केरळ, पुडुच्चेरी, बंगालमध्ये स्वतंत्र लढणार

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणूक बसप स्वबळावर लढणार असून अन्य चार ठिकाणीही स्वबळावरच विधानसभा निवडणुका लढू, असे बसपच्या अक्ष्यक्षा मायावती यांनी सोमवारी जाहीर केले. बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मायावती यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी त्या बोलत होत्या. 

मायावती म्हणाल्या, युती केल्यामुळे केवळ मित्र पक्षांनाच फायदा होतो. त्यामुळे पश्चिम बंगाल, केरळ, पुडुच्चेरी व तामिळनाडू येथे बसप स्वबळावर निवडणूक लढेल. या राज्यांमध्ये बसप कोणत्याही परिस्थितीत अन्य कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही मायावती यांनी पत्रकार परिषदेवेळी केली. त्या म्हणाल्या, देशातील शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे तातडीने मागे घ्यावेत. या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व कुटुंबियातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी. 

कांशीराम यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून त्याअंतर्गत दलित, मुस्लिम, मागास वर्गाला बसपकडून सुविधा व संरक्षण देण्यात येत असल्याचा पुनरुच्चारही मायावती यांनी केला.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख