पारनेर तालुक्यात भाजप-शिवसेना एकत्र - खासदार डाॅ.सुजय विखे 

गोरेगाव(ता.पारनेर) येथे खासदार डाॅ.विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पारनेर तालुक्यात भाजप-शिवसेना एकत्र - खासदार डाॅ.सुजय विखे 
sujay vikhe.jpg

टाकळी ढोकेश्वर ः शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचे एकत्र महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. भाजप विरोधी बाकावर आहे.मात्र पारनेर तालुक्यात आम्ही एकत्र आहोत. माझ्यासोबत व्यासपीठावर शिवसेनेचे पदधिकारी उपस्थित आहेत/ विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे ही भावना स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी दिली असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

गोरेगाव(ता.पारनेर) येथे खासदार डाॅ.विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेचे जलसंधारण व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब तांबे, सुभाष दुधाडे उपस्थित होते.

हेही वाचा...

खासदार डाॅ.विखे म्हणाले,पारनेर तालुक्यास  विकासकामांना सर्वाधिक निधी दिला आहे. याचा उद्देश एकच सर्वांनी एकत्र येऊन तालुका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आहे. 

देवरे प्रकरणी चर्चेतून प्रश्न सुटू शकतात - डाॅ. सुजय विखे 

नागरिक व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचे लोकप्रतिनिधी काम करत असतात. पारनेरच्या तहसीलदार देवरे यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा विषय राज्य पातळीवर गेला आहे. माझ्यापर्यंत तक्रार आली नाही. आली असती तर चर्चेतून हा विषय मार्गी लागला असता. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करावे चर्चेतून प्रश्न सुटू शकतात असे मत खासदार डाॅ.विखे यांनी व्यक्त केले.


लसीकरण गावोगाव करावे - खासदार डाॅ.सुजय विखे 

परिसरातील दहा ते वीस गावे मिळुन मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण ठेवण्यात येत असल्याने कोरोना आजार वाढीचे ते प्रमुख कारण वाटत आहे. लसीकरण प्रत्येक गावात जाऊन करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे तसे निर्देश आहेत. ही प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. अमेरिकेत एक लस बारा हजार रूपयांना घ्यावी लागते. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपये केंद्रसरकार खर्च करणार आहेत, असे खासदार विखे म्हणाले.

Related Stories

No stories found.