नवाब मलिकजी, 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट' ; राणेंच्या अटकेवेळी कायदा कुठे होता?

राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा?
नवाब मलिकजी, 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट' ; राणेंच्या अटकेवेळी कायदा कुठे होता?
Sarkarnama (58).jpg

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh यांच्या जावयाला आणि वकीलांना काल संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला भाजपचे नेते प्रवीण दरेकर Praveen Darekar यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरेकर यांनी टि्वट करुन नवाब मलिकांना टोला लगावला आहे. 

देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने कोणतंही समन्स न देता ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी म्हटलं होते की, ''देशात कायद्याचं राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे का?'' यावर प्रवीण दरेकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, . “अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक करत आहेत. पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिकजी….आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…” 

अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी काल सांयकाळी निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा-बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली होती.

अनिल देशमुख प्रकरणात CBIच्या अधिकाऱ्याला अटक 
मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukhयांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआय़चे उपनिरिक्षकालाअटक केली आहे.  हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयनं केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं आढळले आहे.  तिवारी यांना सीबीआयने अटक केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.