राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं ; म्हणाले..
2Uddhav_20Thackeray_20_20Nilesh_20Rane.jpg

राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं ; म्हणाले..

शिवसेनेचे मंत्री आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?

मुंबई : मुंबईत काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या Narayan Rane arrest जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यक्रते आणि भाजपचे कार्यक्रते एकमेंकांना भिडले. राज्यभर त्याचे पडसाद उमटले. शिवसेना-भाजप कार्यक्रत्यांमधील राडा झाला एकमेंकांवर दगडफेक झाली. नारायण राणेंना अटक, नंतर जामीन या घडामोडींनंतर राणेचे पुत्र, भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे nilesh rane यांनी आज टि्वट करुन पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. Narayan Rane controversy

''काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली? असे टि्वट निलेश राणे यांनी केलं आहे. 

नारायण राणे (Narayan Rane) यांना काल महाड येथील न्यायालयानं जामीन दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पोलिसांनी राणेंना मंगळवारी दुपारी अटक केली होती. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्ष व राणेंच्या बाजूने युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं राणेंचा जामीन मंजूर केला. 
 
मंत्रिमंडळातून नारायण राणेंना मोदी काढू शकतात !
पुणे : ''केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक Narayan Rane arrest ही कायदेशीर होती. घटनेनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींना अटक करता येत नाही. केंद्रीय मंत्र्याला अटक होणे यात काही वेगळे नाही, मात्र केंद्रीय मंत्र्याला अटक झाली असल्याने पंतप्रधान त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढू शकतात, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात हे पहावं लागेल,'' असे घटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी सांगितलं. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in