शिवसेनेनं झोपेचं सोंग घेऊ नये ; आमदार भोळेंचा निशाणा 

भाजपचेआमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेनं झोपेचं सोंग घेऊ नये ; आमदार भोळेंचा निशाणा 
1Sarkarnama_20Banner_20_202021_04_16T152458.101.jpg

जळगाव : ''जळगावकरांना खड्डे, घाणीमुळे त्रास होत आहे, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना Shiv Sena झोपेचे नाटक करीत आहे, त्यांनी जनतेसाठी तातडीने कामे सुरू करावीत, आपण सहकार्य करण्यासाठी त्यांच्या सोबत राहणार आहोत,'' असे आवाहन भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे Suresh Bhole यांनी दिले आहे.

जळगाव Jalgaon शहरातील खड्डे, साफसफाई, तसेच इतर प्रश्नावरून भाजपने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी आज पुन्हा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने नगरसेवक तोडफोड करून सत्ता मिळवली परंतु त्यांना आता साधे रस्त्यावरचे खड्डे आणि साफसफाई करण्याचे काम करता येत नाही. जनता ओरडत असताना आता हे  सत्ताधारी झोपल्याचे नाटक करीत आहे, त्यांना आता जनतेचा आवाज ऐकू येत नाही.

भाजप महापालिकेत सत्तेत असताना आम्ही कर्जमुक्त केले, या शिवाय अमृत योजना, भुयारी गटार योजनेचे काम सुरू केले. या शिवाय आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून निधी मंजूर करून आणला. मात्र, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या राज्यातील सरकारने त्याला स्थगिती दिली आहे. आज जळगावकरांच्या विकासाचा तब्बल ४२ कोटी निधी या सत्ताधाऱ्यांनी अडकवला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंत्र्याकडे जावून त्यावरील स्थगिती हटवून तो निधी उपलब्ध करावा. ही कामे न करता केवळ झोपेचे सोंग हे घेत आहेत. आणि केवळ भाजप वर टीका करीत असतात.

महापालिकेत आज सत्ताधाऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. महापौर, उपमहापौर, आणि बंडखोर नगरसेवक अशी तीन तोंडे तीन दिशेला आहेत आहेत. त्यामुळे त्यांना विकासकामे ही सुचत नाहीत. त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. सत्ताधारी शिवसेनेने झोपचे सोंग बंद करावे, प्रशासनाला कामाला लावून जळगावकरांची त्रासातून सुटका करावी. जनतेच्या प्रश्नावर आपण कोठेही सोबत येण्यास तयार आहोत तसेच वाटत असेल तर विकासाच्या प्रश्नांवर खुली चर्चा करण्याची आपली कधीही तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी ''सरकारनामा''शी बोलताना दिले.

शिवसेनेच्या महापौरांनी घेतला हातात झाडू  ; भाजपला प्रत्युत्तर 
जळगाव : शहरात साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत भाजपने आंदोलन केले, त्याला शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी हातात झाडू घेऊन रस्ता साफ करून कृतीने उत्तर दिले. काल गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमन झालं. महानगरपालिकेतर्फे शहरातील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य तसेच मुर्त्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. आज सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी याठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई सुरू केली. ज्या ज्या ठिकाणी गणपती मूर्त्यांचे स्टॉल होते. त्या ठिकाणी महापौर आणि त्यांच्या टीमने स्वच्छता केली. एक नवीन संदेश नागरिकांना दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.