देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आमदाराचे मंत्रिपदासाठी लॉबिंग 

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली.
देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आमदाराचे मंत्रिपदासाठी लॉबिंग 
BJP MLA lobbying for ministerial post through Devendra Fadnavis

बंगळूर : कर्नाटक भाजपमध्ये नेतृत्वावरून वाद सुरू असतानाच भाजप सरकारचे किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे आमदार रमेश जारकीहोळी मात्र या संघर्षात कुठे दिसलेच नाहीत. त्यामुळे आमदार जारकीहोळी सध्या कोठे आहेत? काय करत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची औत्सुक्य आहे. आक्षेपार्ह सीडी प्रकरणानंतर जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते काहीसे अज्ञातवासातच होते. आता ते थेट मुंबईत दाखल झाल्याचे समजते. तिथूनच त्यांनी राजकीय हालचाली चालविल्याचे समजते. (BJP MLA lobbying for ministerial post through Devendra Fadnavis)

कॉंग्रेस-धजद आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी हे मुंबईलाच गेले होते. तिथूनच त्यांनी राजकीय चक्रे फिरवून आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचले होते. यावेळीही त्यांनी मुंबई गाठली असून पुन्हा सारीपाटाचा खेळ मांडला असल्याचे समजते. त्यामुळे राज्य भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हायकमांडवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज (सोमवारी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. सध्या मंत्रिमंडळात आपला समावेश करण्यात चालढकल होत असल्याबद्दल त्यांनी फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांच्या मध्यस्थीतूनच त्यांनी कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर आणण्यास मदत केली होती.

सीडी प्रकरणात बी रिपोर्ट नोंदविला गेला तरी मंत्रिमंडळात राहाता येते, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही बी रिपोर्ट नोंदवला जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर फडणवीस यांच्यामार्फत दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. सीडी प्रकरण निकाली काढून पुन्हा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मंत्रिपद मिळणार नसेल, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचे प्रभावी अस्त्र वापरण्यास ते सरसावले असल्याचे समजते.

इंदिरा जयसिंगांच्या एन्ट्रीमुळे​ औत्सुक्य?

आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न चालविला असतानाच पद्मश्री पुरस्कारप्राप्त वकील इंदिरा जयसिंग यांनी सीडी प्रकरणातील महिलेच्या बाजूने प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे जारकीहोळी अस्वस्थ झाले आहेत. मंत्रीपदाच्या मार्गातही त्या अडथळा आणण्याची त्यांना भीती आहे. जारकीहोळी मंत्रिमंडळ प्रवेशासाठी प्रयत्नशील असतानाच इंदिरा जयसिंग यांच्या एन्ट्रीमुळे पुढे काय घडेल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in