असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते !

रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते !
3Sarkarnama_20Banner_20_202021_04_06T162856.028.jpg

जालना : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. जन आशीर्वाद यात्रेत दरम्यान राणेंनी शिवसेना Shiv Sena प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेला सुरवातीला याला विरोध केला होता. पण राणेंना दिलेला इशारा शिवसेनेने प्रत्यक्षात आणला नाही. यावर भाजपचे नेते, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

रावसाहेब दानवे म्हणाले की, नारायण राणेंना बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा इशारा द्यायला नको होता. असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते. असा विरोध कधीही होता कामा नये. दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीचं दर्शन अनेक जण घेतात. पण राणेंना विरोध करून शिवसेनाचं गलिच्छ राजकारण केलं. दानवे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे तर डाकूंचे सरकार ; मिलिंद नार्वेकरांचा बंगला मी जमीनदोस्त करणार 
आज नांदेडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे मुक आंदोलन करीत आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं. काल भागवत कराड यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे असतील असं वाटत नाही, असं सांगत पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

''शेतकरी हा वर्षभर बैलांना जीव लावत असतो. बैलगाडा शर्यत ही पारंपारीक आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी बाबत राष्ट्रपतींकडे देखील मागणी करण्यात आली आहे,'' असं सांगत दानवे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा देत त्यांचं समर्थन केलं.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले.  स्मृतीस्थळ परिसरात गोमूत्र शिंपडले.  शिवसेनेने केलेल्या या निषेधाला राणेंनी उत्तर दिलं आहे. ''गोमूत्र हे पवित्र्य असतं, पण गोमूत्र हातात घेण्याची पात्रताही शिवसेनेची नाही,'' अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in