आता फडणवीस म्हणतात, माझं ठरलंय! - bjp leader devendra fadnavis says I have decided now  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आता फडणवीस म्हणतात, माझं ठरलंय!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

आता माझं सर्व ठरलं असून खराब चेंडूला मी सीमापार धाडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांचा रोख राज्य सरकारवरच होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. 

मुंबई: महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगला असताना एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसले. तर क्रिकेटच्या मैदानावरूनच त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मुक्तपणे टोलेबाजी करत आता माझं सगळं ठरलं आहे, असे सांगितले.

फडणवीस म्हणाले, क्रिकेट खेळण्यातली मजा काही औरच आहे. लहानपणी मला फलंदाजी, गोलंदाजी करायला आवडायची. मात्र फिल्डिंग करण्यास मला फारसे आवडायचे नाही. सध्या सुरू असणाऱ्या राजकारणातील फलंदाजी, गोलंदाजी याचा संदर्भ देत फडणवीस पुढे म्हणाले की आता मी फास्ट बाॅलिंग करणार, गुगली टाकणार व बाॅलिंग स्टम्प टू स्टम्प करणार. बाॅडीलाइन बाॅलिंग करणार नसून वेळप्रसंगी गुगली देखील टाकेन. आता माझं सर्व ठरलं असून खराब चेंडूला मी सीमापार धाडणार असल्याचे ते म्हणाले. त्यांचा रोख राज्य सरकारवरच होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

दरम्यान, राज्य सरकारवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, चौकशी कुणाची करणार? चोरी करणाऱ्याची की ती पकडून देणाऱ्याची? हिरेन मृत्यू प्रकरण तसेच परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाचा तपास लागेलच. परंतु, चोरी करणाऱ्याला राज्य सरकार खुलेआम पाठीशी घालत असून चोरी पकडणाऱ्याची मात्र चौकशी करते. हफ्तेखोरी, रॅकॅट बाहेर काढणाऱ्यांवर राज्य सरकार कधी कारवाई करणार?

यूपीएचा कप्तान बदला हे १६ वा गडी म्हणत असेल तर त्याला किती महत्व द्यायचे, हे आपण ठरवावे असे म्हणत रश्मी शुक्ला यांच्याबाबत काहीही विधान करण्यापूर्वी त्या महिला आहेत याची जाणीव ठेवायला हवी होती, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंगच्या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्‍मी शुल्का यांच्यावर गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील मंत्री करत आहेत. त्यानिमित्ताने रश्‍मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी त्यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख