कोकणात शिवसेनेचा नारायण राणेंना धक्का      

संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप आमने सामने आले होते.
कोकणात शिवसेनेचा नारायण राणेंना धक्का      
BJP corporator to join Shiv Sena .jpg

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा नुकतीच पार पडली. जनआशीर्वाद यात्रेमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackaray) बोचरी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप आमने सामने आले होते. जनआशीर्वाद यात्रेनंतर कोकणात राणेंना धक्का बसला आहे. देवगडचे दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नगरसेवकांनी शिवबंध हाती बांधले आहे. (BJP corporator to join Shiv Sena) 

देवगडच्या भाजप नगरसेविका हर्षदा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोंयडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला. या निमित्ताने राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला शिवसेनेने उत्तर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

जनआशीर्वाद यात्रा कोकणात निघाली त्यानंतर भाजप मध्ये नाराजी. हर्षा ठाकूर आणि प्रकाश कोंयडे हे दोन नगरसेवक शिवसेनेत आलेत. नितेश राणे आणि त्यांचे वडील यांचे कोकणात फक्त स्वागत झाले. जनआशीर्वाद त्यांना मिळाले नाही. जनआशीर्वाद यात्रा हीच येड्यांची जत्रा होती, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. 

भाजप हे राणे समर्थक झाले आहे. त्याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला. 5 वर्ष मी भाजप ची नगरसेविका आहे. त्याआधी मी पंचायत समिती सदस्य होते. घाणेरडे राजकारण भाजपमध्ये केले जाते त्याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत मला नक्की न्याय मिळेल, असे नगरसेविका हर्षदा ठाकूर यांनी सांगितले. राणे यांच्या अधोपतनाची ही सुरुवात आहे. कोकणात भाजपमध्ये नाराजी आहे. आणखी भाजप चे कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असे सतीश सावंत यांनी सांगितले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.