एकाच कामाचे दोन दिवसात दोनदा भुमिपूजन ! विखे - थोरात गटात श्रेयवाद

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी व जोर्वे हे दोन गट राजकियदृष्ट्य़ा संवेदनशिल समजले जातात. या दोन्ही गटातील 26 गावे मतदार संघ पुर्नरचनेत शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडली गेली आहेत.
एकाच कामाचे दोन दिवसात दोनदा भुमिपूजन ! विखे - थोरात गटात श्रेयवाद
Balasaheb Thorat

संगमनेर : प्रशासकिय कामासाठी संगमनेर तालुक्यावर अवलंबून असलेल्या, तर राजकिय दृष्टीने शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडलेली आश्वी व जोर्वे गटातील 26 गावे कायमच राजकिय त्रांगड्य़ाचा सामना करताना दिसतात. या गावांमधील विविध विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी विखे व थोरात गटात सुरु असलेल्या रस्सीखेचाचा प्रत्यय दोन दिवसात ग्रामस्थांना आला आहे. (Bhumipujan twice in two days for the same work! Vikhe - Credit in Thorat group)

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी व जोर्वे हे दोन गट राजकियदृष्ट्य़ा संवेदनशिल समजले जातात. या दोन्ही गटातील 26 गावे मतदार संघ पुर्नरचनेत शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडली गेली आहेत. संगमनेर तालुक्यात असल्याने राजकिय क्षेत्रात एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेले, राज्याचे विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा दिसून येते. या भागातील ओझर खुर्द हे गाव समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वास्तव्यामुळे गेल्या काही दिवसात चांगलेच चर्चेत आले आहे. या गावासाठी मुख्यमंत्री जलजीवन योजनेअंतर्गत 68 लाख 97 हजार रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. दरम्यान, या प्रकाराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा..

रविवार (ता. 1) रोजी या योजनेच्या कामाचे भुमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील व शालिनी देशमुख महाराज, जिल्हा परिषद सदस्य अँड. रोहिणी निघुते यांच्या उपस्थितीत झाले. तर आज त्याच कामासह नेमबाई माळ रस्ता व शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमिपूजन निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते व इंद्रजित थोरात व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन दिवसात दोन वेळा झालेल्या भुमिपूजनांमुळे गावासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीचे श्रेय कोणाचे हा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे.
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.