आमदार महेश लांडगेंना मिळाला डिस्चार्ज

माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी असे ट्वीट महेश लांडगे यांनी केले आहे
आमदार महेश लांडगेंना मिळाला डिस्चार्ज
BJP MLA Mahesh Landge Gets discharge from the hospital

पिंपरी : भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून परिवारासह डिस्चार्ज देण्यात आला आहे. लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जूनला निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रीटमेंट सुरु राहिल, असे ट्वीट करत लांडगे यांनी आपल्या डिस्चार्जची माहिती दिली आहे. 

दरम्यान, पिंपरी - चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांचे कोरोनामुळे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर 25 जूनपासून उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीत आढळले होते.

इकडे पुण्यात माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः टिळेकर यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. कालच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता आणखी एका भाजप नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. 

Related Stories

No stories found.