पार्थ पवारांचे काम आम्ही केले; पण त्यावेळी तुम्ही कुणाचे पैसे घेतले? 

ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही, त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आत्माराम कलाटे यांच्याविषयी बोलावे का?
पार्थ पवारांचे काम आम्ही केले; पण त्यावेळी तुम्ही कुणाचे पैसे घेतले? 
Atmaram Kalate's son's reply to Rajabhau Hagwane's criticism

पौड (जि. पुणे) :  ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही, त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आत्माराम कलाटे यांच्याविषयी बोलावे का?, असा पलटवार युवा नेते तुषार आत्माराम कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ हगवणे यांच्यावार केला आहे. (Atmaram Kalate's son's reply to Rajabhau Hagwane's criticism)

मुळशी तालुक्यातील कोळवण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हगवणे यांनी कलाटे यांच्यावर खरमरीत टिका केली होती. कलाटे यांचे चिरंजीव तुषार यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे.

ज्या  कलाटे यांनी भोर, वेल्हे, मुळशीत आणि अनेक वर्षे जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले, अशा व्यक्तींवर त्यांच्या उंचीच्या व्यक्तीने जर बोलले तर आम्ही ऐकून घेऊ शकतो. पण, जो व्यक्ती ग्रामपंचायतीला पडतो. स्वतःच्या गावची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही, की नातेवाईकांना निवडूनही आणता आले नाही, त्यांनी कलाटे यांच्याविषयी बोलताना विचार करायला हवा होता, असा टोला तुषार कलाटे यांनी राजाभाऊ हगवणे यांना लगावला.

पार्थ पवार यांचे काम लोकसभेला आम्ही केलेचं. मात्र, तुम्ही त्यावेळेस कुणाचे पैसे घेतले होते, हे आता जाहीर करायचे का? , असा सवालसुद्धा तुषार कलाटे यांनी यावेळी बोलताना केला. काही कारणांमुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. मात्र, पक्षाची बांधिलकी आजही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते हगवणे? 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवावर मोठे झालेले पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक स्वार्थापोटी शिवसेनेत गेले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात उघडपणे काम केले. आता राष्ट्रवादीला चांगले दिवस आल्यानंतर पुन्हा संधी साधू पाहत आहेत. अशा दलबदलू, स्वार्थी आणि घरभेदी संचालकांना घरी पाठवा, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे यांनी आत्माराम कलाटे आणि रामचंद्र ठोंबरे यांना नाव न घेता टोला लगावला होता. 

ते म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध संघावरील अकार्यक्षम आणि वयोवृद्ध संचालकांमुळे मुळशी तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून जनविकास रखडला आहे. त्यामुळे  सर्वसामान्यांच्या विकासाचे धोरण असलेल्या सहकारात आगामी निवडणुकीत मुळशीकरांनी पक्षनिष्ठा असलेल्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in