पंकजा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता : वैद्यनाथ बॅंकेचा अधिकारी अटकेत

शंभू महादेव साखर कारखान्याने 2002 ते 2017 मध्ये 47 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
पंकजा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता : वैद्यनाथ बॅंकेचा अधिकारी अटकेत
parali vaijinath bank.jpg

परळी वैजनाथ : उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याची महाराष्ट्रभर चर्चा आहे.

हावरगाव (ता.कळंब) येथील शंभू महादेव साखर कारखान्याने येथील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी 12 मार्चला कळंब पोलीस ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचे अध्यक्ष दिलीप आपेटसह 40 जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. 

हेही वाचा...

शंभू महादेव साखर कारखान्याने 2002 ते 2017 मध्ये 47 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. 1 लाख 54 हजार 177 साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली होती. या प्रकरणी कळंब येथे अध्यक्ष दिलीप आपेटसह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुरुवारी (ता.2) उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी शहरातून वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा...

उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास आहे. आतापर्यंत केवळ दोघांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. गुरुवारी शहरातून वैद्यनाथ बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना ताब्यात घेतले. वैद्यनाथ बँकेवर माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात ही बँक आहे. खासदार डॉ प्रितम मुंडे बँकेच्या संचालक आहेत. तर मागच्या महिन्यात अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच या बँकेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.
 

Related Stories

No stories found.