मोदींच्या 'इमेज बिल्डिंग' वर भडकले अनुपम खेर..म्हणाले...

स्वतःची 'इमेज' बनविण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-13T094504.749.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-13T094504.749.jpg

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी  ठरत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे Narendra Modi प्रशंसक ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर  Anupam Kherयांनी प्रथमच मोदींवर हल्लाबोल केला आहे.  अनुपम खेर म्हणतात की मोदींनी स्वतःची 'इमेज' बनविण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहे. anupam kher advice to modi government forget image building save peoples lives 

काही दिवसापूर्वी अनुपम खेर यांनी "आयगा तो मोदीही" अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अनुपम खेर हे मोदींचे प्रशंसक म्हणून ओळखले जातात, त्यांनी प्रथमच उघडपणे मोदी सरकारवर टीका केल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनुपम खेर यांच्या पत्नी अभिनेत्री किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात जे होत आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे. अशा परिस्थिती मोदींनी इमेज बनविण्यापेक्षा जनतेचे प्राण वाचविणे गरजेचे आहे. देशाच्या आरोग्य यंत्रणेत कुठेतरी दोष आहे. पण या परिस्थितीत विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करणे चुकीचे आहे. सरकारने या संकटाचा सामना करुन ज्या जनतेला त्यांना निवडून दिले त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, गंगा आणि अन्य नदीमध्ये मिळणारे शव पाहून वाटते की हा अमानवी प्रकार आहे. माझ्या मते सध्या जे होत आहे, त्याला सरकार जबाबदार आहे. यांची आपल्या सगळ्यांनी चीड यायला पाहिजे. 

हेही वाचा  : मोदींनी लशींच्या कंपनीत फोटो काढले..पण नोंदणीला विलंब केला..याला जबाबदार कोण...प्रियंका गांधींचा सवाल..
  
नवी दिल्ली  : देशात दररोज वाढत चालेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय आहे.  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेवरून कॅाग्रेसकडून केंद्र सरकारला नेहमीच लक्ष्य केले जात आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॅा. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Narendra Modi या संकटाच्या मुकाबल्यासाठी सूचना करणारी पत्रे पाठविली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॅाग्रेसकडून नेहमीच टीका होत आहे. राहुल गांधी त्यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. लसीकरणावरुन कॅाग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा Priyanka Gandhi यांनी आज नरेंद्र मोदींवर टि्वट करुन तोफ डागली आहे 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in