बाबर- पडळकरांच्या एकोप्याने नव्या समीकरणाची नांदी

निकालानंतर बाबर यांनी एकोपा ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.
बाबर- पडळकरांच्या एकोप्याने नव्या समीकरणाची नांदी

आटपाडी (सांगली) : खानापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा दोस्ताना निवडणूकीनंतरही चांगलाच जमला आहे. सत्काराच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दोघांनीही एकोप्याने मतदारसंघातील प्रश्न आणी विकासकामांना गती देण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही भुमिका मतदारसंघात नव्या राजकिय समीकरणाची नांदी ठरू शकते. 

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात खानापूर मतदारसंघ सेनेला गेला. सेनेने आमदार श्री. बाबर यांनाच दुसरयादा संधी दिली तर गोपीचंद पडळकरांनी भाजपात प्रवेश करून बारामतीतून निवडणूक लढवली. खानापूर मतदारसंघातील देशमुख आणि पडळकर गट भाजपात आहेत. दोघांनीही सेनेचे श्री. बाबर यांचा प्रचार करून त्यांना निवडूण आणण्यात मोठा वाटा उचलला. 

दरम्यान, निकालानंतर बाबर यांनी एकोपा ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी यांनी गोपीचंद पडळकर आणि समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांचे झरे येथे जाऊन भेट घेतली आणि आभार मानले. तर पडळकर बंधुनीही विजयाबदल अभिनंदन केले. मतदारसंघातील विविध प्रश्नावरही चर्चा झाली. विकास कामे करण्यासाठी लवकरच एकत्रीत बसून नियोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in