मी सध्या खासदार नसलो, तरी राजकारणाला विराम दिलेला नाही

कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू
मी सध्या खासदार नसलो, तरी राजकारणाला विराम दिलेला नाही
Anant Geete gave a signal to be active in politics again

चिपळूण : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मी सध्या खासदार नाही; मात्र असे असले तरी मी राजकारणाला विराम दिलेला नाही, असे सांगून आपले मनसुबे निवृत्त होण्याचे नाहीत, असे सूतोवाच गीते यांनी केले. (Anant Geete gave a signal to be active in politics again)

दापोली येथील कुणबी हितवर्धिनी सेवा संघाच्या मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या मेळाव्यात माजी खासदार गीते बोलत होते. आपण स्वतः कुणबी हितवर्धिनीचे सभासद झालो असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची संस्था चालकांना सूचना व आवाहन केले. 

रायगड लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवानंतर काही दिवस शांत असलेले गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली येथे कुणबी भवन उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही गिते यांनी दिली आहे.

आमदार योगेश कदम म्हणाले की, रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या सहकार्याने कुणबी समाजाच्या स्वाभिमानासाठी दापोलीत कुणबी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यास संस्थाध्यक्ष उन्मेश राजे, संस्था सचिव सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले, कुणबी समाजोन्नती संघाचे दापोली तालुका प्रतिनिधी आणि दापोली तालुका मुंबई शिवसेनेचे सचिव नरेश घरटकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबईचे माजी अध्यक्ष आणि दापोली तालुका कुणबी पतपेढीचे माजी अध्यक्ष रमेश काटकर, शिवसेना दापोली तालुका मुंबई संघटक चंद्रकांत शिगवण, तालुका उपसंघटक विजय ठोंबरे, माजी उपसभापती अनंत बांद्रे, उपतालुका प्रमुख गुणाजी गावणूक आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.