देशमुख प्रकरणात ट्विस्ट; डागा आणि तिवारींना दिल्लीला नेले   

देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
देशमुख प्रकरणात ट्विस्ट; डागा आणि तिवारींना दिल्लीला नेले   
Anil Deshmukh, CBI .png

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळत चालवला आहे. सीबीआयने बुधवारी रात्री त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी व वकील आनंद डागा (Anand Daga) यांना ताब्यात घेतले होते. गौरव यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी केल्यानंतर सीबीआयकडून सोडण्यात आले. (Anand Daga will be produced before a Delhi CBI court) 

मात्र, डागा आणि सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना सीबीआयचे पथक दिल्लीला घेऊन गेले आहे. दिल्लीतील सीबीआय न्यायालयात त्यांना हजर केले जाणार, असल्याची माहिती आहे. देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआयचे उपनिरिक्षकाला अटक केली आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. त्यामुळे तिवारी आणि डागा यांना दिल्लीला नेण्यात आले आहे.  

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयानं सीबीआय परवानगी दिली आहे. त्यानुसार प्राथमिक तपासानंतर सीबीआयकडून देशमुखांवर गुन्हाही दाखल केला आहे. तर ईडीकडून मनी लाँर्डिंगच्या संशयावरून देशमुखांची चौकशी सुरू आहे. देशमुख कुटूंबियांनी गौरव यांचे अपहरण झाल्याचा दावा केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कुणालाही ताब्यात घेण्यापूर्वी नोटीस देणे किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या जातात. पण गौरव यांना अचानक 8 ते 10 लोके घेऊन गेली आहेत. त्यांना कुठे नेले याचा काहीच तपास नाही, असा दावा देशमुख कुटूंबियांनी केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.