अजित पवारांनी सांगितली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील आठवण 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदासाठी 1992 मध्ये मी उभा होतो. त्या काळी रामचंद्र भगत यांनी दिलेला पाठिंबा आजही स्मरणात आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेवर सत्ता आली. सोमेश्वर सहकारी साखर कारखानाही ताब्यात आला. कारखान्याच्या विस्तार वाढीसाठी दोन कोटींची मागणी संचालक मंडळाने केली होती. त्यात भगत यांचा आग्रह मोठा होता.
अजित पवारांनी सांगितली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील आठवण 
Ajit Pawar shared his memories of the District Bank elections

वडगाव निंबाळकर (जि. पुणे) : "पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदासाठी 1992 मध्ये मी उभा होतो. त्या काळी रामचंद्र भगत यांनी दिलेला पाठिंबा आजही स्मरणात आहे. त्यानंतर जिल्हा बॅंकेवर सत्ता आली. सोमेश्वर सहकारी साखर कारखानाही ताब्यात आला. कारखान्याच्या विस्तार वाढीसाठी दोन कोटींची मागणी संचालक मंडळाने केली होती. त्यात भगत यांचा आग्रह मोठा होता. त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि पूर्णही केली. योग्य वेळी विस्तारवाढ झाल्याने कारखान्याची प्रगतीची घोडदौड सुरू झाली, अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र भगत यांचे नुकतचे निधन झाले आहे. भगत कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) येथे अजित पवार आले होते. त्यावेळी भगत यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी रामचंद्र भगत यांचे योगदान राहिले आहे. या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खंदे समर्थक म्हणून भगत यांची ओळख होती 

अजित पवार पुढे म्हणाले की सन 2011-12 मध्ये पुन्हा सोमेश्‍वर साखर कारखान्याची विस्तारवाढ झाली. या वेळी संचालक मंडळाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे कारखाना प्रगतिपथावर राहिला आणि आता आपला कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. 

सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबतचा विषय घेतल्यावर जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला का? अशी विचारणा सोबत असलेले प्रांताधिकाऱ्यांना केली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत काळजी घेण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

परिसरातील शेती विषयावर बोलताना पवार म्हणाले सिंचन क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या नीरा डावा कालव्यातून सुटणारे पाणी पुरेसे नाही. पावसाळ्यात नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यावरील उपाय म्हणून नीरा डावा कालव्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. यामुळे तळी भरण्याचे काम लवकर आटपेल. शेतकऱ्यांनीही ठिबक सिंचन आणि आधुनिकतेचा वापर केला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

या वेळी ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष विलास भगत, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत, बन्सीलाल भगत, संजय भगत, डॉ. यशवंत भगत, अक्षय भगत, प्रसाद भगत, आदित्य भगत, सार्थक भगत उपस्थित होते. 

Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in