MPSC : अजितदादांनी शब्द पाळला!

अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सदस्यांची यादी पाठवली आहे.
MPSC : अजितदादांनी शब्द पाळला!
Sarkarnama Banner - 2021-08-02T173928.825.jpg

मुंबई : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच रखडलेल्या परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि त्याच्या पालकाना सतावत आहे. काही दिवसापूर्वी  पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ता. ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती.

याबाबत अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सदस्यांची यादी पाठवली आहे. याबाबतचे टि्वट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करती माहिती दिली आहे. रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, दादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.

MPSC : रिक्त पदे भरण्यासाठीही सरकारला 'वाझे ' हवेत का ? 
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ता. ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजितदादांनी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या 'वाझे' ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.  

E-RUPI : स्मार्टफोन, इंटरनेटशिवाय एसएमएसने पैसे ट्रान्सफर करा!  
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून आज एक नवी सुविधा e-RUPI Digital Payment नागरिकांना दिली जाणार आहे.  'ई-रुपी'चं E-RUPI वाऊचरच्या सहाय्याने ट्रान्झॅक्शनसाठी कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा इतर डिजिटल पेमेंट अॅपची गरज भासणार नाही. याद्वारे थेट ट्रान्झॅक्शन म्हणजेच देवाण-घेवाण पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरला पेमेंट मिळेल. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या 'ई-रुपी'चं उद्घाटन करण्यात येत आहे. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.