अजितदादांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न 

मराठा समाजाच्या 2 हजार 145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तिपत्र देण्याची मागणी केली.
 Chhatrapati Shahu Maharaj, Ajit Pawar .jpg
Chhatrapati Shahu Maharaj, Ajit Pawar .jpg

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सोमवारी (ता. १४ जून) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.  (Ajit Pawar met Chhatrapati Shahu Maharaj in Kolhapur)

अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण माडले. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या 2 हजार 145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तिपत्र देण्याची मागणी केली. 

दरम्यान, अजित पवार यांनी सकाळी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. अजित पवारांनी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती.   

या भेटीनंतर छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केले पाहिजे'' असे मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, ''मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही''. 

मराठा समाजाने स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचा आहे. निकालाचे मराठीत भाषांतर करुन समजून घेतले पाहिजे. न्यायालयाचाही अवमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in