चंद्रकांतदादांच्या हस्ते होणारी सोडत आता अजितदादा काढणार 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ११ जानेवारीला काढण्यात येणाऱ होती. ही सोडत आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी(ता. 27) काढण्यात येणार आहे.
चंद्रकांतदादांच्या हस्ते होणारी सोडत आता अजितदादा काढणार 
Ajit Pawar

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ११ जानेवारीला काढण्यात येणाऱ होती. मात्र  ऐनवेळी ती रद्द झाली. ही रद्द झालेली सोडत आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. 27) काढण्यात येणार आहे. 

अजित पवारांच्या हस्ते ही सोडत काढण्याची मागणी करून त्यासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसने आंदोलन केले होते. त्यामुळे होणारी सोडत राजशिष्टाचाराला धरून नसल्याचे कारण देत महापालिकेने शेवटच्या क्षणी ती रद्द केली होती. 

दरम्यान, शहरातील वाढत्या कोरोनामुळे पूर्वी ऑफलाईन होणारी ही सोडत आता ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे या योजनेत अर्ज केलेल्यांना प्रत्यक्ष सोडतीच्या ठिकाणी हजर राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन उपस्थित राहावे लागणार आहे. तसे आवाहन महापालिकेने केले आहे. 

गेल्या महिन्यातील ही सोडत रद्द झाल्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपवर नामुष्की झाली होती. महापौर आणि सभागृहनेत्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करावे लागले होते. स्वताच्या मालकीच्या घराचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या घरांच्या योजनेत अर्ज केलेल्या हजारो रहिवासीयांनी ही सोडत लवकर काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे एक पाऊल मागे घेत भाजपने आता ही सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या हस्ते काढण्याचा सुवर्ण मध्य शोधला आहे. परिणामी ही सोडत आता विनासायास पार पडेल. शहरासाठी काडीचेही योगदान नसलेल्या चंद्रकांतदादांच्या हस्ते ती होऊ न देण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅाग्रेसने दिला होता. तसेच या योजनेचे फक्त वीस टक्के काम झाले असल्याने निव्वळ श्रेय घेण्यासाठी देखील सोडत काढण्यास विरोध केला होता. मात्र, त्यानंतर जेमतेम दीड महिन्यात या योजनेचे बहूतांश काम हे अजूनही मार्गी लागलेले नाही, तरीही सोडत काढली जात आहे. मात्र, यावेळी ती अजितदादांच्या हस्ते असल्याने राष्ट्रवादीचा विरोध आता मावळला आहे. 

या योजनेकरिता आलेल्या ४७,८७८ अर्जांपैकी ४७,७०७ पात्र ठरले आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर असे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण आहे. ही सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर

(Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in) Live व YouTube (Link – www.youtube.com/PCMCINDIA )

द्वारे दाखविण्यात येईल. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सोडतीच्या ठिकाणी न येता ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोडतीचा तपशील महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यात येईल, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे व भाजपचे गटनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
...
 

Related Stories

No stories found.