महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन 

महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन 

गोंदवले (ता. माण, जि.सातारा) : दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या तालुक्‍यातही आज दूध बंद आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शेतकऱ्यांनी धामणी (ता. माण) येथे  दुध रस्त्यावर ओतून दिले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात खुद्द दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या माण तालुक्‍यानेही आघाडी घेतली आहे. तालुक्‍यातील अनेक गावांतील दूध संकलन केंद्र आज बंद होती. त्यामुळे अनेकांनी दूध ओतून आंदोलनात सहभाग नोंदवला. धामणी येथे संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच हजारो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले. या आंदोलनादरम्यान सातारा-पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यामुळे पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंड्याचा मार्गही विस्कळीत झाल्या होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in